बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी ‘मिस इंडिया’ सन्मानित गुल पनागने आम आदमी पक्षात प्रवेश केला असून तिला चंदीगढ मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली आहे.
‘आप’चे नेते मनिष सिसोदीया यांच्या उपस्थितीत गुल पनाग यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी ‘आम आदमी’ पक्षात अभिनेत्रीला उमेदवारी देण्याबाबत सिसोदिया यांना विचारले असता, जर डॉक्टर आणि वकील आम आदमी असू शकतात मग, अभिनेत्री आम आदमी का असू शकत नाहीत? असा प्रतिसवाल करत गुल पनाग यांचे पक्षाकडून स्वागत करून लोकसभा निवडणुकीसाठी पनाग यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
यावेळी गुल पनाग म्हणाल्या की, मला या शहराने भरपूर काही दिले आहे मग मी याची परतफेड करु शकली नाही, तर माझा धिक्कार असो. त्यामुळे सध्याच्या भ्रष्टाचारी राजकराणाला साफ करण्यासाठी आम आदमीच्या माध्यमातून ‘आम आदमी’चे प्रश्न सोडविण्याचे माझे प्रयत्न असतील. ज्या शहरात माझा जन्म झाला त्या शहराचे मी देणे लागते या विचाराने काम करेन असेही पनाग यावेळी म्हणाल्या