पाकिस्तानातील मियाँवाली जिल्हय़ात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी टीव्ही पत्रकाराची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामा टीव्हीचे पत्रकार शहजाद इक्बाल यांना लाहोरपासून ३०० किमी अंतरावर असलेल्या मियाँवाली येथे चार सशस्त्र हल्लेखोरांनी अडवले व त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. मियाँवालीचे जिल्हा पोलीस अधिकारी मुजाहिद अकबर यांनी सांगितले, की इक्बाल (वय २८) यांची बशीर अहमद व त्याच्या बंधूंशी एका महिलेवरून शत्रुत्व होते. बशीर व त्याच्या तीन भावांची नावे तक्रारदार कुटुंबीयांनी एफआयआरमध्ये दिली आहेत. गेली सात वर्षे इक्बाल हे पत्रकारिता व्यवसायात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunman killed pakistani journalist
First published on: 24-04-2014 at 03:58 IST