पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचा मुलगा अली हैदर गिलानी याचे गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण केले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घडलेल्या या थरारनाट्यात हैदर यांच्या सहायकासह सुरक्षारक्षकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
पाकिस्तानातील निवडणुकीच्या प्रचारासाठी हैदर हे मुल्तानमध्ये एक बैठक घेत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. हैदर यांचे समर्थक असलेले पाच जण हल्ल्यामध्ये जखमी झालेत. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न हैदर यांच्या सुरक्षारक्षकांनी केला. मात्र, त्यात ते जखमी झाले. त्यांचे सहायक मोहियुद्दीन हेदेखील जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानातील कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunmen kidnap former pak pm yousuf raza gilanis son in multan
First published on: 09-05-2013 at 04:43 IST