आसामच्या कोक्राझार जिल्ह्य़ात शनिवारी पहाटे अलीपूरद्वार-गुवाहटी सिफंग पॅसेंजर रेल्वेचे काही डबे रुळांवरून घसरून झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले.
पहाटे सव्वापाच वाजता सलाकती आणि बासुगाव या स्थानकांच्या दरम्यान असलेल्या पुलावर या रेल्वेचे पाच डबे रुळांवरून घसरले.
अलीपूरद्वार आणि न्यू बोंगैगाव येथून रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे या मार्गावरील काही रेल्वे गाडय़ा उशिराने धावत होत्या तर काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या.
रद्द केलेल्या गाडय़ांमध्ये न्यू जलपैगुडी- देकारगाव पॅसेंजर, न्यू जलपैगुडी- न्यू कुचबिहार स्पेशल, ढुबरी- फकीरग्राम पॅसेंजर, गुवाहटी- अलीपूरद्वार जंक्शन पॅसेंजर, कामाख्या- फकीरग्राम पॅसेंजर, सिलघाट- ढुबरी राज्यराणी एक्स्प्रेस, न्यू कुचबिहार- न्यू जलपैगुडी स्पेशल आणि कामाख्या- अलीपूरद्वार इंटरसिटी एक्स्प्रेसचा समावेश आहे. रविवारची फकीरग्राम- ढुबरी पॅसेंजरही रद्द केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guwahati siphung express derails in kokrajhar 10 injured
First published on: 24-05-2015 at 06:00 IST