बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला अशक्यप्राय विजय मिळवणे शक्य झाले नसतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तानचा ऑफ-स्पिनर मोहम्मद हाफीजने टाकलेल्या ‘फुलटॉस’ चेंडूची खिल्ली उडवली आहे. ‘हाफीजचा फुलटॉस चेंडू हवेतूनच थेट अंतराळात जाऊन पुन्हा लॉर्ड्स स्टेडियमवर अवतरतो आणि बांगलादेशचा फलंदाज त्याला सीमारेषेची दिशा दाखवतो,’ अशी चित्रफीत ‘आयसीसी’ने ट्विटरवर टाकली आहे. ‘आयसीसीला हे कृत्य शोभत नाही,’ अशा शब्दांत पाकिस्तानी चाहत्यांनी यावर कडाडून टीका केली आहे.