नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हल्दवानीमधील रेल्वेच्या २९ एकर जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. ‘मानवतावादी प्रश्न’ असा हा मुद्दा असल्याचे सांगून न्यायालयाने ५० हजार नागरिकांना एका रात्रीत हटविता येणार नाही, असे स्पष्ट केले. वादग्रस्त भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमणे हटविण्याच्या आदेशाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे जमिनीचा मालकीहक्क आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘‘याबाबत एक व्यावहारिक उपाय शोधणे आवश्यक आहे.’’ रेल्वेच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जमिनीवर चार हजार ३६५ कुटुंबांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी ५० हजार नागरिक वास्तव्य करत आहेत. यामधील बहुसंख्य मुस्लीम आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haldwani railway land encroachment sc stays uttarakhand high court order zws
First published on: 06-01-2023 at 06:04 IST