व्हिसा अर्जात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अमेरिकी प्रशासनाची नाराजी ओढवून घेणाऱ्या माजी राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाची पूर्वपरवानगी न घेताच प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करणे तसेच स्वत:च्या दोन्ही मुलींची पारपत्रे तयार करून घेतल्याप्रकरणी खोब्रागडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
घरकामाला मोलकरीण ठेवताना तिची पुरेशी माहिती व्हिसा अर्जात न दिल्याने जानेवारी महिन्यात देवयानी यांना अमेरिकी प्रशासनाने अटक केली होती. तसेच त्यांना अमेरिका सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून देवयानी मायदेशात आहेत.
विदेश सेवेत असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना विदेशात जशी वागणूक देण्यात येते तशीच वागणूक भारतात असलेल्या विदेश सेवेतील विदेशी अधिकाऱ्यांना देण्यात यावी. – देवयानी खोब्रागडे,
 अकोल्यात बोलताना.