सिडनीजवळ गुरुवारी दुपारी एक हेलिकॉप्टर कोसळून त्यामधील चौघे जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हेलिकॉप्टर उतरण्याच्या बेतात असतानाच ही दुर्घटना घडली. सिडनीच्या दक्षिणेकडे ६० कि.मी. अंतरावर असलेल्या बुली टॉप्स या परिसरात गवताळ भागांत हेलिकॉप्टर कोसळले.
या घटनेचे वृत्त कळताच चौकशी पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून अपघाताच्या निश्चित कारणाचा शोध सुरू आहे, असे न्यू साऊथ वेल्सचे पोलीस प्रवक्ते डेव्ह रोझ यांनी सांगितले. रॉबिन्सन आर ४४ हे हेलिकॉप्टर खासगी वैमानिकाने भाडय़ाने घेतले होते.