उत्तराखंडला बसलेल्या महापुराच्या तडाख्यात अनेक यात्रेकरूंचे बळी गेले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्या पाश्र्वभूमीवर राजकीय आणि बिगर राजकीय पक्ष आणि गटांनी इफ्तार पाटर्य़ा टाळ्याव्यात, असे आवाहन अजमेर दग्र्याचे प्रमुख झैनुल अबेदिन अली खान यांनी केले आहे.
उत्तराखंडला बसलेला तडाखा ही देशातील मोठी शोकांतिका असल्याने सार्वजनिक इफ्तार पाटर्य़ा टाळणे उचित ठरेल. अशा पाटर्य़ावर लाखो रुपये खर्च केले जातात ती रक्कम पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरता येईल, असेही खान यांनी म्हटले आहे.
पाटर्य़ा टाळून त्या रकमेचा वापर पूरग्रस्तांच्या, पीडितांच्या पुनर्वसनासाठी केल्यास ती मानवतेची सेवा होईल आणि तीच इस्लाम धर्माची शिकवण आहे, असेही खान यांनी एका निवेदनात म्हटले आहे.