पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट घडवल्याची कबुली इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळ याने एनआयएपुढे दिली आहे. त्याचवेळी याप्रकरणी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला हिमायत बेग याचा स्फोटाशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासाही भटकळने केला असल्याचे समजते. भटकळच्या या खुलाशामुळे याप्रकऱणी करण्यात आलेल्या पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता आहे.
‘त्या’ स्फोटाचा बदला घेण्यासाठीच भटकळने केले हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट
एनआयएच्या कोठडीत असलेल्या यासिन भटकळकडून सध्या त्याने भारतात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या स्फोटांची माहिती घेण्यात येत आहे. जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाला होता. पुण्यात राहणाऱया ज्यू नागरिकांना लक्ष्य करण्यासाठीच हा स्फोट घडवून आणल्याचे यासिनने कबुल केले. बरेच ज्यू नागरिक या बेकरीमध्ये येत असतात. त्यामुळेच तिथे स्फोट घडवून आणण्यात आला. त्याचबरोबर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही स्फोट घडविण्याचा कट इंडियन मुजाहिदीनने आखला होता. हा स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी मोहंमद कातिल सिद्दीकी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी बॉम्ब असलेली बॅग ठेवण्यात सिद्दीक अपयशी ठरला आणि नंतर त्याने ही बॅग मुंबईजवळील समुद्रात फेकून दिली, असे बेगने सांगितले. इंडियन मुजाहिदीनचे रियाझ भटकळ आणि इक्बाल भटकळ हेच या स्फोटाच्या कटाचे सूत्रधार होते, अशीही माहिती त्याने दिली आहे.
हैदराबादेतील स्फोटाचे आदेश पाकमधूनच
जर्मन बेकरी स्फोटाशी हिमायत बेगसोबतच अबु जुंदाल आणि फय्याज कागजी यांचाही कोणताही संबंध नसल्याचे भटकळने कबुली देताना सांगितल्याचे समजते.
भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर या दोघांना गेल्या आठवड्यात बिहारमध्ये नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली. या दोघांनाही दिल्लीतील न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
चाळीस स्फोट घडवणारा यासिन जेरबंद 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himayat baig had nothing to do with the german bakery blast says yasin bhatkal
First published on: 05-09-2013 at 11:45 IST