दीपिका सिंह राजावत यांच्या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यामुळे तुम्हीच खऱ्या अर्थाने सर्व शक्तिमान आहात असं म्हणत एमाने दीपिका यांचा एक फोटो ट्विट केला. सोशल मीडियावर ज्या फोटोमुळे दीपिका चर्चेत आल्या होत्या तोच फोटो आणि एका वेबसाइटचं वृत्त पोस्ट करत एमाने याविषयी आपलं मत मांडलं.
एमाची ही पोस्ट सध्या प्रकाशझोतात आली असून सेलिब्रिटी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाबोतच आपलं सामाजिक भानही वेळोवेळी जपतात ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. ज्यानंतर सोशल मीडियापासून ते राजकारण आणि कलाविश्वापर्यंत सर्वांनीच या घटनेचा निषेध केला असून आरोपींनी कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
All power to Deepika Singh Rajawat https://t.co/sZzDVcIFNo
— Emma Watson (@EmmaWatson) May 3, 2018
वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत
कोण आहेत दीपिका राजावत?
पेशाने वकील असलेल्या दीपिका एक सामाजिक कार्यकर्त्यासुद्धा आहे. ‘वॉईस फॉर राइट्स’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुराही दीपिका सांभाळतात. ही संस्था लहान मुलं आणि महिलांशी संबंधित प्रश्नांवर काम करते. दीपिका यांना २०१४-१५ मध्ये महिला अधिकारांच्या कामासाठी निवडलं गेलं होतं.