Ahmedabad Plane Crash 2025 Report: अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडिया बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. प्राथमिक तपास अहवालात असे दिसून आले आहे की, उड्डाणानंतर एका सेकंदात विमानाचे इंजिन इंधन नियंत्रण स्विच बंद झाले. विमान अपघात तपास ब्युरोने १२ जून रोजी घडलेल्या घडामोडींची तपशीलवार माहिती दिली आहे.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळपासून ड्रिमलायनरच्या काय काय हालचाली झाल्या, याची सविस्तर माहिती अहवालात देण्यात आली आहे.

सकाळी ११.१७ वाजता: एअर इंडियाचे ड्रिमलायनर VT-ANB नवी दिल्लीहून अहमदाबादला उतरले.

दुपारी १.१८.३८ वाजता: विमानतळावर बे ३४ वरून सदर विमान निघताना दिसून येते.

दुपारी १:२५:१५: क्रू सदस्यांनी टॅक्सी क्लिअरन्सची परवानगी मागितल्यानंतर एअर ट्राफिक कंट्रोलकडून सदर परवानगी दिली जाते. यानंतर विमान रनवे २३ च्या दिशेने जाते.

दुपारी १:३२:०३: विमान ग्राऊंड कंट्रोलकडून टॉवर कंट्रोलकडे हस्तांतरित केले जाते.

दुपारी १:३७:३३: उड्डाणासाठीची परवानगी मिळते.

दुपारी १:३७:३७: उड्डाणासाठी विमान सज्ज होते.

दुपारी १:३८:३९: विमान उड्डाण घेते.

दुपारी १:३८:४२: विमानाने १८० नॉट्स इतका कमाल वेग प्राप्त केला. यानंतर अचानक इंजिन १ आणि इंजिन २ बंद झाले. इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विच रन वरून कटऑफवर गेल्यामुळे इंधन पुरवठा खंडित झाला.

अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल (डावीकडे) आणि क्लाईव्ह कुंदर (उजवीकडे)
अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल (डावीकडे) आणि क्लाईव्ह कुंदर (उजवीकडे)

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगनुसार वैमानिकांमध्ये विसंवा

एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारले की, तू कटऑफ केलास का? यावर दुसऱ्या वैमानिकाने उत्तर दिले, मी काहीही केले नाही. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॅम एअर टर्बाइन लगेच तैनात झाल्याचे दिसून आले. तसेच उड्डाणानंतर काही सेकंदात विमानाची उंची कमी होताना दिसली.

दुपारी १:३८:४७: दोन्ही इंजिनचे काम हळूहळू निष्क्रिय होत जाते. रॅटमधून हायड्रॉलिक पॉवर पुरवण्यास सुरुवात होते.

दुपारी १:३८:५२: इंजिन १ चा इंधन कटऑफ स्विच रनवर परत आणला जातो.

दुपारी १:३८:५६: इंजिन २ चाही इंधन कटऑफ स्विच पूर्ववत करण्यात येतो.

दुपारी १:३९:०५: एका वैमानिकाने संकट काळातील ‘मेडे, मेडे, मेडे’ असा संदेश दिला.

दुपारी १:३९:११: विमानातील डेटा रेकॉर्डिंग थांबते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुपारी १:४४:४४: विमान कोसळल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विमानतळ परिसरातून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना होतात.