How Much PM Modi foreign trips cost : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांचे परदेश दौरे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होताना दिसत आहे. राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२१ ते २०२५ दरम्यानच्या परदेश दौऱ्यांवर सरकारने सुमारे ३६२ कोटी रुपये खर्च केल्याची बाब समोर आली आहे. फक्त २०२५ बद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्यांवर ६७ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे, या कालावधीत पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांचा दौरा केला होता.

तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील जाहीर केला.

सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, या सर्व दौऱ्यामध्ये २०२५ मध्ये केलेला फ्रान्सचा दौरा हा सर्वात महागडा ठरला. यासाठी २५ कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आले. तर अमेरिकेच्या दौऱ्याचा खर्च हा १६ कोटींपेक्षा जास्त होता.

मॉरिशस, सायप्रस आणि कॅनडा सारख्या देशांना दिलेल्या भेटीवेळी झालेल्या खर्चाचे आकडे अद्याप प्रलंबित आहेत, कागदपत्रांमध्ये नमूद केले आहे.

आकडेवारीनुसार, मागच्या वर्षाच्या तुलनेत २०२४ मध्ये रशिया आणि युक्रेन यासह १६ देशांना दिलेल्या भेटीसाठी १०९ कोटी रुपये खर्च करणअयात आले. तर २०२३ मध्ये जवळपास ९३ कोची रुपयांचा खर्च आला होता. तर त्यापूर्वी २०२२ आणि २०२३ मध्ये अनुक्रमे ५५.८२ आणि ३६ कोटी रुपये खर्च झाले होते.

२०२३ मध्ये पंतप्रधानांनी अमेरिका दौऱ्यावेळी तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती, ज्यासाठी २२ कोटी रुपयांचा खर्च आला होता. या भेटीदरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण अशा महत्त्वाच्या घटकांवर चर्चा झाली होती.

बांग्लादेश, इटली आणि युके या देशांना २०२१ मध्ये भेट दिली होती, पण फक्त एकट्या अमेरिकेच्या दौऱ्यावर १९ कोटींहून अधिक रुपयांचा खर्च आला होता. २०२२ च्या खर्चाच जर्मनी, जपान या दोन देशांच्या भेटीवेळी अनुक्रमे ९ कोटी रुपये आणि ८ कोटी रुपये इतका खर्च आला होता.

या आकडेवारीमध्ये या दौऱ्याशी संबंधित सार्वजनिक कार्यक्रम, जाहिराती आणि प्रसरणाचा खर्च यांचा देखील समावेश आहे. जसे की २०२३ च्या इजिप्त दौऱ्यावेळी ११.९० लाख रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय प्रवास हा मोदींच्या परराष्ट्र धोरणाबाबतच्या भूमिकेचा एक महत्त्वाचा घटक राहिला आहे. त्यामुळे या दौऱ्यांचा खर्च हा कायम चर्चेचा आणि चौकशीचा विषय राहिला आहे.