Israel Airstrike In Tehran Video: इराणी माध्यमांनी बुधवारी एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्रायली संरक्षण दलांनी केलेल्या हवाई हल्ल्याचे चित्रण असल्याचा दावा त्यांनी केला आहे. व्हिडिओमध्ये उत्तर तेहरानमधील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात स्फोट झाल्याचे दिसत आहे. स्फोटांच्या तीव्रतेमुळे प्रवाशांसह गाड्या हवेत फेकल्या जात असल्याचे दृश्यांमध्ये दिसून येत आहे. हा कथित हल्ला इस्रायलच्या “रायझिंग लायन” ऑपरेशन दरम्यान झाल्याचे म्हटले जात आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. १२ दिवसांच्या युद्धादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले होते. या दरम्यान अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली होती. अमेरिकेने इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केल्यानंतर हा संघर्ष आणखी तापला होता. या हल्ल्यांची पाठराखण करताना अमेरिकेने म्हटले होते की, इराणला अण्वस्त्रे मिळविण्यापासून रोखण्याची गरज असल्याने त्यांनी हे हल्ले केले होते.

१३ जूनपासून सुरू झालेल्या इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या ११व्या दिवशी, अमेरिकेने उघडपणे त्यात उडी घेतल्याने याला एक नवीन वळण मिळाले होते. अमेरिकेने इराणच्या तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य करत त्यावर हवाई हल्ले केले होते. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणु प्रकल्पांचा समावेश होता.

यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालटाचे समर्थन केले होते. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करत लिहिले होते की, “शासनबदल हा शब्द वापरणे राजकीयदृष्ट्या योग्य नाही, परंतु जर सध्याची इराणी राजवट इराणला पुन्हा महान बनवू शकत नसेल, तर राजवट का बदलू नये??? इराणला पुन्हा महान बनवा!!!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २४ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धविरामाची घोषणा केली होती.