न्यूयॉर्क : रशियाकडून तेल घेऊन आणि त्याची विक्री करून भारत मोठा नफा कमावत असल्याचा आरोप करत भारतीय मालावरील आयातशुल्क ‘मोठ्या प्रमाणात’ वाढविण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिला. रशियाने लादलेल्या युद्धात युक्रेनचे किती नागरिक मरत आहेत, याची भारताला चिंता नाही. त्यामुळेच भारताकडून अमेरिकेला दिले जाणारे शुल्क आता प्रचंड वाढविले जाणार आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले.