Shubhanshu Shukla Water Bender Video Viral: आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर हे आता पृथ्वीवर परतण्यास सज्ज झाले आहेत. ते आपल्या तीन सहकाऱ्यांसह परतणार आहेत. परतीचा प्रवास तब्बल २२ तासांचा प्रवास असणार आहे. शुभांशू शुक्ला आणि ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील तीन क्रू सदस्य हे जवळपास १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहिले आहेत.

दरम्यान पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी शून्य गुरुत्वाकर्षणात पाण्याबरोबरचे खेळ करून दाखवले. हा खेळ करताना ते स्वतःला ‘वॉटर बेंडर’ म्हणवून घेतात. शुभांशू शुक्ला यांनी विनोदी अंदाजात हा व्हिडीओ चित्रीत केला आहे. व्हिडीओमध्ये पाण्याचा एक गोळा हवेत तरंगताना दिसत आहे.

शुभांशू शुक्ला व्हिडीओत म्हणाले की, हा खूपच रोमांचकारी अनुभव आहे. आम्ही इथे अशा प्रकारचे अनेक प्रयोग करण्यात व्यस्त आहोत. पण कामातून जेव्हा केव्हा थोडा वेळ मिळतो, तेव्हा मी खिडकीजवळ जाऊन फोटो काढतो.

शून्य गुरुत्वाकर्षणात केले पाण्याचे खेळ

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील ज्येष्ठ सदस्य आणि अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसनही यावेळी शुभांशू शुक्ला यांच्याबरोबर दिसत आहेत. शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की, गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे मोकळ्या जागेतील ताण अधिक प्रबळ होतो, त्यामुळे पाणी शून्य गुरुत्वाकर्षणामुळे गोळ्याच्या रुपात बदलते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समोरापावेळी भावुक झाले शुक्ला

दरम्यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचा निरोप घेत असताना शुक्ला भावुक झालेले पाहायला मिळाले. “आपल्या समारोपाच्या भाषणात ते म्हणाले, अंतराळातून भारत खूपच चांगला दिसतो. अतिशय अविश्वसनीय असा हा प्रवास होता”, असे ते म्हणाले.