मी भाजपाची राजकीय ‘आयटम गर्ल’ आहे: आझम खान

मलाच माहीत नाही माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान यांनी स्वत:ला भाजपाची राजकीय 'आयटम गर्ल' असल्याचे म्हटले आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान यांनी स्वत:ला भाजपाची राजकीय ‘आयटम गर्ल’ असल्याचे म्हटले आहे. माझ्या नावावर मागील विधानसभा निवडणूक लढवली गेली होती. आताही पुन्हा माझ्याच नावावर आगामी लोकसभा निवडणूक लढली जाईल, असे ते म्हणाले. एका बैठकीसाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, मलाच माहीत नाही माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत. माझ्या नावाने किती समन्स आणि वॉरंट निघाले आहेत, याची कल्पनाच नाही. मी तर फक्त या खटल्यांसाठीच फिरत असतो.

माझ्याकडे कोणतीही संपत्ती नाही. माझे फक्त एकच बँक खाते आहे. जे विधान भवन येथील स्टेट बँकेच्या शाखेत आहे. याशिवाय देशात कोठेही माझ्या नावाने बँकेत खाते आढळून आले तर मला कुतुबमिनार येथे फाशी द्यावी, असे ते म्हणाले.

देशविघातक ताकदींना पराभूत करण्यासाठी दलित, मागास आणि असंघटितांना एकत्र करावे लागेल. तेव्हाच इन्कलाब होईल. राममंदिरबाबत बोलताना आझम खान यांनी सर्वोच्च न्यायालय ही देशातील सर्वोच्च संस्था असल्याचे भाष्य करत न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I am bjps political item girl says sp leader azam khan