शिवराजसिंह चौहान म्हणतात, ‘हो मी मदारी आहे…..

हो मी मदारी आहे, माझा डमरू वाजवून मी मध्य प्रदेशचा विकास करतो

(संग्रहित छायाचित्र)
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हो मी मदारी आहे, जो असा डमरू वाजवतो की गरीबांचे वीजेचे बिल माफ होतात. मी असा मदारी आहे, जो गरीब मुलांच्या फी भरतो आणि ज्याने मध्य प्रदेशला अव्वल राज्य बनवण्याची शपथ घेतली आहे. जेव्हा माझ्या हाती मध्य प्रदेशची सत्ता आली तेव्हा राज्य अशक्त होते. या राज्याला मी सशक्त केलंय’, असं शिवराजसिंह चौहान म्हणाले.

सीहोर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना चौहान यांनी कमलनाथ यांच्या विधानाचा समाचार घेतला. हो मी मदारी आहे, माझा डमरू वाजवून मी मध्य प्रदेशचा विकास करतो आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

यापूर्वी, भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना कमलनाथ यांनी चौहान यांचं नाव न घेता, मदारीप्रमाणे राज्यात घोषणा सुरू आहेत. जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रकार सुरू आहे, असं म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I am madari who reformed mp says shivraj singh chouhan