लोकपाल विधेयकावरून काँग्रेसशी निर्माण झालेला संघर्ष पहाता दिल्लीतील ‘आप’च्या सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र आपणच आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नसल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
जनलोकपाल संमत केले नाही तर राजीनाम्याची धमकी केजरीवाल यांनी दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सहानुभूती मिळवण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरूझाली. मात्र आपले सहकारी दिवस-रात्र मेहनत करत आहोत. सरकारची चिंता आम्हाला नाही. आम्ही पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या घोटाळ्यांची प्रकरणे बाहेर काढणार नाही असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. गेल्या १५ वर्षांतील प्रत्येक घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले. सत्तेसाठी आम्ही आलेलो नाही तर देशासाठी आम्ही काम करत आहोत. आम आदमी पक्ष हा सत्ता केंद्र बनता कामा नये. आमचे ध्येय साध्य झाल्यावर आमच्या पक्षाचे अस्तित्व राहणार नाही. माध्यमांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. केजरीवाल यांना सरकार चालवण्यात अपयश येत असल्याने ते यातून सुटकेचा मार्ग शोधत आहेत, असा आरोप भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
अपक्षाचा पाठिंबा मागे
‘आप’चे बंडखोर विनोद बिन्नी यांच्या पाठोपाठ अपक्ष आमदार रमबिर शोकीन यांनी केजरीवाल सरकारचा पाठिंबा मागे घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
आपलेच सरकार पाडण्याचा प्रयत्न नाही -केजरीवाल
लोकपाल विधेयकावरून काँग्रेसशी निर्माण झालेला संघर्ष पहाता दिल्लीतील ‘आप’च्या सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
First published on: 11-02-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am not trying to topple myself delhi cm arvind kejriwal