राजधानी दिल्लीमध्ये धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागलं कारण एका जपानी मुलीशी होळीच्या दरम्यान अश्लील वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला. ही मुलगी होळी खेळण्यासाठी खास जपानहून भारतात आली होती. पण तिला रंग लावण्याच्या बहाण्याने तीन तरूणांनी तिच्याशी अश्लील वर्तन केलं. या प्रकारामुळे ही तरूणी खूप घाबरली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. शनिवारी पोलिसांनी याविषयीची माहिती दिली. आता घडलेल्या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या जपानी मुलीची आपबिती समोर आली आहे. तिनेच आपला हा भयंकर अनुभव कथन केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही जपानी तरूणी आता बांगलादेशला गेली आहे. तसंच या मुलीने कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन कलम ३५४ च्या अंतर्गत FIR दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ ८ मार्चच्या दिवशीचा आहे. शुक्रवारी ही तरूणी बांगलादेशला निघून गेली आहे. ही मुलगी पहाडगंज या ठिकाणी थांबली होती तिथे होळी खेळत असतानाच तिच्यासोबत अश्लील वर्तन झालं.या घटनेचा व्हिडिओ या मुलीनेच ट्विट केला होता. ज्यानंतर तो व्हायरल झाला आणि या मुलीने तो व्हिडिओ तिच्या अकाऊंटवरून डिलिट केला असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Female Student Death by Suicide
“सॉरी ताई..”, म्हणत १७ वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं, लैंगिक शोषण झाल्याचा आरोप
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

जपानी मुलीने सांगितली आपबिती

शनिवारी या जपानी तरूणीने ट्विट करत आपल्याला आलेला भयंकर अनुभव कथन केला आहे. मी होळी खेळण्यासाठी भारतात आले होते. हा रंगांचा उत्सव आहे हे मी ऐकून होते. मात्र यादिवशी माझ्यासोबत जे घडलं त्यामुळे मी खूपच घाबरून गेले होते. मी जेव्हा माझ्यासोबत काय घडलं ते पोस्ट केलं तेव्हा मलाच नावं ठेवणाऱ्या कमेंट्स त्यावर येऊ लागल्या होत्या त्यामुळे मी माझ्या अकाऊंटवरून पोस्ट केलेला व्हिडिओ डिलिट केला.व्हिडिओत पाहता येणं कठीण आहे मात्र माझ्यासोबत जे वर्तन झालं त्यानंतर इतर काही लोकांनी आणि कॅमेरामनने माझी मदत केली. होळी हा वसंत उत्सवातला असा एक सण आहे जो एकमेकांना रंग लावून साजरा करतात. पण माझ्यासोबत जे झालं त्यामुळे मी प्रचंड घाबरून गेले.

मी होळीचा व्हिडिओ पोस्ट करताना मला भारतातली संस्कृती किती चांगली आहे, होळीमागचा उद्देश किती सकारात्मक आहे हे दाखवायचं होतं. मात्र जे काही माझ्यासोबत घडलं त्यामुळे मला धक्का बसला. माझी काळजी जे लोक करत होते त्यांची मी माफी मागते असंही या मुलीने म्हटलं आहे. तसंच मला आशा आहे की होळीच्या दिवशी अशा प्रकारे महिलांशी गैरवर्तन किंवा अश्लील वर्तन होण्याचे प्रकार कमी होतील.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या जपानी मुलीने तिच्याशी जे वर्तन करण्यात आलं त्याबाबत कुठलीही तक्रार दिलेली नाही. मात्र या व्हायरल व्हिडिओची दखल पोलिसांनी तसंच राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी या व्हिडिओची चौकशी केली जावी आणि दोषींना अटक केली जावी अशी मागणी दिल्ली पोलिसांकडे केली आहे.