कराचीत जायला ‘व्हिसा’ लागत नव्हता – यासिन भटकळ

अटकेमध्ये असलेला इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक यासिन भटकळ २००६ मध्ये एका व्यावसायीक

अटकेमध्ये असलेला इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक यासिन भटकळ २००६ मध्ये एका व्यावसायीक विमान कंपनीच्या विमानाने दुबईमधून पाकिस्तानमध्ये गेला होता. त्यावेळी यासिनजवळ ‘व्हिसा’ नव्हता व कराची विमानतळावर देखील कोणत्याही स्थलांतर चौकशी शिवाय त्याला जाऊ देण्यात आल्याचा खुलासा यासिन याने तपास पथकाजवळ केला आहे.
यासिन भटकळला हैदराबादमध्ये न्यायालयीन कोठडी
पाकिस्तानमध्ये त्यावेळी ५० दिवस एका अज्ञात स्थळी यासिनला दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण संपल्यावर यासिन पाकिस्तानमध्ये आला त्याच प्रकारे परत दुबईला रवाना झाला. दुबईला जाते वेळी देखील त्याला खोट्या ‘व्हिसा’वर कोणत्याही चौकशीव्यतिरिक्त रवाना करण्यात आल्याचे यासिन म्हणाला.
यासिन भटकळच्या एनआयए कोठडीत आणखी वाढ
इंडियन मुजाहिद्दीनच्या कारवायांचा प्रमुख अमिर रझा खान याने डिसेंबर २००५ मध्ये यासिन याला शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी दुबई मार्गे पाकिस्तानला जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. अमिर रझा खान यानेच त्यावेळा यासिन याला पाकिस्तानमध्ये वावरण्यासाठी ‘मुस्तफ्फा’ हे टोपन नाव दिले असल्याचे मागील महिन्यामध्ये भारत-नोपाळ सिमेवर अटक करण्यात आलेल्या यासिन भटकळ याने तपास पथकाजवळ कबूल केले.
दुबईमध्ये एका खेळाचे साहित्य विकणाऱ्या दुकानदाराच्या मदतीने यासिन याने कायदेशिर रित्या दुबईमध्ये कामासाठी आल्याचा व्हिसा मिळवला होता. इंडियन मुझाहिद्दीनचा दुसरा सहसंस्थापक रियाझ भटकळ याच्याकडून पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याच्या सूचना मिळेपर्यंत यासिनला दुबईमध्येच वास्तव्य करून होता.
यासिन याने दुबईमधून मुंबईला येण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान कंपनीच्या विमानाचे तिकीट कराचीमधून खरेदी केले होते. त्याने रियाझ याला ऑनलाईन मेसेंजर द्वारे तो भारतामध्ये जात असल्याचे कळवले होते.          
“मी दुबईमध्ये विमानामध्ये बसलो. विमान कराचीमध्ये उतरल्यावर एक व्यक्ती हातामध्ये ‘मुस्तफ्फा’ नावाचा फलक घेऊन माझी वाट पाहात होता,” असे यासिन म्हणाला.

 

  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I was allowed to enter karachi without visa skip airport immigration yasin

ताज्या बातम्या