यजमान इंग्लंडने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन करत ३८६ धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर जेसन रॉयने झळकावलेल्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने मोठ्या धावसंख्येचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.

बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एका विचीत्र पद्धतीने बाद झाला. आर्चरने टाकलेल्या चेंडूने एक बेल्स पडली आणि चेंडू थेट सीमारेषेपारही केला. सौम्या सरकारच्या या विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

दरम्यान, बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना मश्रफी मोर्ताझा आणि मुस्तफिजुर रेहमानने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.