भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रिकेटचा प्रेक्षकवर्ग जमेल तशी तयारी करत आहे. अनेक ठिकाणी आपल्या आवडत्या खेळाडूसाठी आणि संघासाठी पूजा आणि इतर गोष्टी करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लोकांनी मोठे स्क्रीन लावून विशेष पद्धतीने सामना दाखवण्याची सोया केली आहे. इतर देशांचे क्रिकेटपटूदेखील या सामन्याची वाट पाहत आहेत. तशातच ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलने देखील या सामन्यासाठी विशेष अशी तयारी केली आहे.

विंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल याने इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला आहे. त्यात तये १ विशिष्ट असा कोट घातला आहे. त्यात उजव्या हातावर तिरंग्याचे तीन रंग आहेत, तर डाव्या हातावर पाकिस्तानच्या ध्वजाचा हिरवा रंग आहे. माझे दोनही संघांवर खूप प्रेम आहे. दोनही देशांबद्दल मला आदर आहे. २० सप्टेंबर रोजी माझ्या वाढदिवशी मी हा सूट नक्कीच परिधान करेन, असे त्याने त्या फोटो खाली लिहिले आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या सामन्यात शिखर धवन हा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या हातावर चेंडू आदळला होता. यामुळे शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. तिसरा सामना मात्र पावसामुळे वाया गेला. सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीचा भारतीय संघाला या सामन्यात फटका बसण्याची शक्यता आहे. शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे तिसऱ्या सामन्यात लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले.