केंद्रीयमंत्री रामदास आठले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हि निर्माण करत टीका देखील केली आहे.

आठवले यांनी म्हटले की, पाच वर्षे चांगले काम करूनही काहीजणांनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने ठरवलं आहे की, मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच, यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना म्हटले की, जर राहुल गांधी आपला पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा चालवतील? म्हणूनच त्यांचा अमेठीतून पराभव झाला.

या अगोदर शनिवारी आठवले यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि अन्य पक्षांची महायुती २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २४० ते २५० जागांवर विजयी होईल. त्यांनी हे देखील म्हटले होते की, भाजपा-शिवसेनेने छोट्या मुद्यांना सोडून आपल्या ताकदीच्या आधारे जागांचे वाटप करायला हवे व निवडणूक लढायला हवी.