आयआयएस अधिकारी शरत चंदर यांची पंतप्रधान कार्यालयाच्या माहिती अधिकारपदी नियुक्ती करण्यात आली. चंदेर हे १९९९ च्या आयआयएस बॅचचे अधिकारी आहेत. पर्सनल आणि ट्रेनिंग विभागातर्फे ‘पीएमओ’च्या माहिती अधिकारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंदेर यांची सध्याच्या कामातून मुक्तता करून नवी जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. चंदेर हे सध्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) मध्ये पंतप्रधान कार्यालयाचा पत्रव्यवहार संभाळत होते.