गुजरात एटीएससोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, भारताच्या तटरक्षक दलाच्या जहाजांनी ९ कर्मचार्‍यांसह ‘अल हज’ या पाकिस्तानी बोटीला सुमारे २८० कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन घेऊन जात असताना अरबी समुद्रात भारताच्या हद्दीत पकडले.

आता पुढील तपासासाठी बोट जखाऊ येथे आणली जात आहे. अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाकडून देण्यात आलेली आहे.

या अगोदर देखील भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘अंकित’ने जानेवारी महिन्यात रात्री अरबी समुद्रात केलेल्या कारवाईदरम्यान ‘यासिन’ या पाकिस्तानी बोटीला पकडले होते. या बोटीत चालक दलासह १० पाकिस्तानी होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती.