भ्रष्टाचार आणि परदेशी बँकांतील काळ्या पैशाच्या मुद्दय़ावरील काँग्रेस आघाडी शासनाला सातत्याने धारेवर धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांना केंद्र शासनाने सणसणीत चपराक लागवली आह़े रामदेव बाबा यांच्याकडून चालविण्यात येणाऱ्या न्यासांनी योग शिबिरे घेताना सेवाकर चुकवल्याचा आरोप करीत शासनाने त्यांच्याकडे ५ कोटी रुपायांच्या कराची मागणी करणारी नोटीस पाठवली आह़े पतंजली योगपीठ आणि दिव्य योग या हरिद्वार येथील न्यासांनी भरवलेली बाबांची योग शिबिरे, हे व्यावसायिक उपक्रम होत़े त्यामुळे या संस्थांनी उपस्थितांकडून जमा केलेल्या शुल्कावरील कर म्हणून ५.१४ कोटी रुपये शासन दरबारी जमा करणे आवश्यक आहे, असे बजावणारी नोटीस उत्पादन शुल्क विभागाने पाठवली आह़े
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2012 रोजी प्रकाशित
कर बुडवल्याप्रकरणी रामदेव यांच्या न्यासांना ५ कोटींची नोटीस
भ्रष्टाचार आणि परदेशी बँकांतील काळ्या पैशाच्या मुद्दय़ावरील काँग्रेस आघाडी शासनाला सातत्याने धारेवर धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांना केंद्र शासनाने सणसणीत चपराक लागवली आह़े

First published on: 12-11-2012 at 02:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incom tax notice ramdev trust to 5 crore