मायावतींचा भाऊ अडचणीत! आयकर विभागाकडून ४०० कोटींचा बेनामी प्लॉट जप्त

आयकर विभाग आणि ईडीकडून आनंदकुमार यांच्या मालमत्तेबाबतची तपासणी सुरु आहे

संग्रहित छायाचित्र

बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायवती यांचा भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण आयकर विभागाने त्यांचा ४०० कोटींची किंमत असलेला बेनामी प्लॉट जप्त केला आहे. ही जमीन दिल्लीजवळच्या नोएडा भागात आहे. मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी करत होते. याच दरम्यान त्यांच्याकडे एक बेनामी प्लॉट असल्याचे आयकर विभागाला समजले ज्यानंतर त्यांनी छापा मारून ही कारवाई केली.

आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्रलता या दोघांचा हा बेनामी प्लॉट जप्त करण्याचे आदेश १६ जुलै रोजी देण्यात आले. त्यानंतर आज १८ जुलै रोजी आयकर विभागाने ही कारवाई केली. आनंदकुमार यांच्या नावे आणखी बेनामी संपत्ती आहे अशीही माहिती आयकर विभागाने दिली. त्या संपत्तीवरही टाच येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आयकर विभागासोबतच ईडीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. जप्त करण्यात आलेला प्लॉट सात एकरांचा आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे असंही आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Income tax department attaches 7 acre land belonging to bsp chief mayawatis brother anand kumar and his wife scj