पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांपूर्वी एका रूग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी रूग्णालयातील एका डॉक्टराल मारहाण केल्याच्या निषेधार्थ बुधावारपासून सुरू झालेल्या डॉक्टरांचे आंदोलन आता देशभर पसरत असल्याचे दिसत आहे. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) निवासी डॅाक्टर संघटनेच्या सदस्यांनी या आंदोलनास पाठिंबा म्हणुन हेल्मेट घालुन काम करण्याच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिल्लीतील डॅाक्टर्स हेल्मेट घालुन रूग्णांची तापसणी करत आहेत. तर बंगालमधील जवळपास १५१ डॅाक्टरांनी राजीनामे सोपवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर देशभरातील अनेक रूग्णालयांधील डॅाक्टरांनी आंदोलनाचा भाग म्हणुन राजीनामे दिले आहेत. याशिवाय कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला आदेश दिले आहेत की लवकरात लवकर आंदोलक डॅाक्टरांशी चर्चा करून हे आंदोलन शांत करा. याशिवाय न्यायालयाने मुख्यमंत्री ममता यांना हे देखील विचारले आहे की, डॅाक्टरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काय उपाय योजना केल्या आहेत. या अगोदर मुख्यमंत्री ममता यांनी आंदोलक डॅाक्टरांनी कामावर रूजू होण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, मात्र डॅाक्टर आंदोलनावर ठाम राहिले अनेकांनी गुरूवारीच राजीनामे दिले तर अनेकजण आज राजीनामे देत आहेत. मुख्यमंत्री ममतांनी मात्र हे भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

बंगालमधुन सुरू झालेल्या या डॅाक्टर्स आंदोलनाला आता देशभरातील डॅाक्टरांकडून पाठिंबा मिळत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांमधील डॅाक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या रूग्णालयांमधील रूग्णांचे हाल सुरू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing support of the country wide doctor movement in bengal msr
First published on: 14-06-2019 at 15:00 IST