भारतीय वंशाचे प्राध्यापक डॉ. कींशुक यांची बुधवारी अमेरिकेतील नामांकित विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली. विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक कींशुक यांनी राजस्थान विद्यालयातून आभियांत्रिकी शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी स्कॉलंडच्या स्टेथ क्लाईड विद्यापीठात पदवीत्तोर शिक्षण घेतले. तर इंग्लडच्या मोंट फोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी संपन्न केली आहे. २०१० पासून कॅनडामधील अलबर्टा शहरातील अताबस्का विद्यापीठात ते सहाय्यक कुलगुरु पदावर कार्यरत होते. या विद्यापाठात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे नेतृत्व केले. १५ जुलै रोजी प्राध्यापक डॉ.कींशकु नॉर्थ टेक्सास विद्यापीठाच्या कारभाराची सुत्रे हाती घेतील. प्रगतीशील विद्यापीठाची नवीन जबाबदारी स्विकारण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नियुक्तीनंतर दिली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या अग्रमानांकित महाविद्यालयाला त्यांच्याकडून अधिक अपेक्षा असून या अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही प्राध्यापक कींशुक यांनी म्हटले आहे. प्राध्यापक कींशुक यांनी आपल्या कारकिर्दिची सुरुवात भारतीय भूमीतून प्रशिक्षणार्थी म्हणून केली होती. तसेच भारतामध्ये त्यांनी राजकीय महाविद्यालयामध्ये अंशकालीन अधिव्याख्याता म्हणून कार्य केले होते. त्यांची अमेरिकेच्या अव्वल नामांकित महाविद्यालयाच्या कुलगुरुपदी झालेली नियुक्ती भारतीयांना अभिमान वाटावी अशी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2016 रोजी प्रकाशित
भारतीय प्राध्यापकाची अमेरिकेमधील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
प्राध्यापक कींशुक यांनी आपल्या कारकिर्दिची सुरुवात भारतीय भूमीतून प्रशिक्षणार्थी म्हणून केली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-07-2016 at 20:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indain dean american university