भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यातील (PSU) १७२ पैकी ८६ स्वायत्त संचालक हे भाजपाशी संबंधित असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने मिळवलेल्या माहितीमध्ये हे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील १७२ स्वायत्त संचालकांपैकी ८६ हे भाजपाशी संलग्नित आहेत. १४६ केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांमधील कंपन्यांची यावेळी पडताळणी करण्यात आली, यामधील ९८ कंपन्यांमध्ये १७२ स्वायत्त संचालक आहेत. त्यात ८६ भाजपा नेते हे संचालक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामध्ये आता मार्केट्स रेग्युलेटर सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाना मंगळवारी स्वतंत्र संचालकांच्या व्यवस्थेत सुधारणा कशी करावी याविषयी चर्चा करणार आहे. त्यांची नियुक्ती आणि मंडळामध्ये त्यांची भूमिका याबाबत यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (आयआयसीए) या केंद्र सरकारच्या थिंक टँकने हे स्पष्टपणे सांगितले होते की, “पीएसयूसाठी स्वायत्त संचालकांची निवड स्वतंत्र राहिली नाही. अनुभवी डोमेन तज्ञांऐवजी माजी आय.ए.एस. किंवा अलीकडेच राजकीय लोकांना प्राधान्य दिले जात आहे त्यामुळे आयडीची संपूर्ण कल्पनाच बिघडली आहे” असे त्यांनी म्हटले होते.

भाजपा नेत्यांचा स्वतंत्र संचालकांच्या यादीमध्ये समावेश

एक्सप्रेसने ब्लू चिप पीएसयूसह महारत्न (तीन वर्षांत २५,००० कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल) यांच्या स्वायत्त संचालकांशी संवाद साधला. त्यासोबत अशा ८६ लोकांशी संपर्क साधण्याची प्रयत्न केला त्यापैकी ८१ स्वायत्त संचालकांनी प्रतिसाद दिला. यामध्ये मनीष कपूर हे भाजपाचे उप कोषाध्यक्ष आहेत. राजेश शर्मा हे भाजपाच्या सीए सेलचे माजी राष्ट्रीय संयोजक आहेत. राज कमल बिंदल हे १९९६ पासून भाजपासोबत आहेत. हे सर्व भारत हेवी इलेक्ट्रिक्सच्या स्वायत्त संचालकांचा यादीमध्ये सामील आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमच्या स्वायत्त संचालकांमध्ये असणारे राजेंद्र अरलेकर हे गोवा विधानसभेचे माजी सभापती आहेत. लता उसेंदी छत्तीसगढ भाजपा उपाध्यक्षा आहेत. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामधील एन शंकरप्पा कर्नाटक भाजपाचे राज्य कार्यकारी सदस्य आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियममधील जी. राजेंद्रन पिल्लई हे केरळ भाजपाचे राज्य कार्यकारी सदस्य आहेत.

गेल (इंडिया) लिमिटेडमधील बंतो देवी कटारिया स्वायत्त संचालक आहेत. त्या केंद्रीय मंत्री रतन लाल कटारिया यांच्या पत्नी आहेत. कटारिया हरियाणाच्या अंबाला येथील खासदार आहेत. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एआर महालक्ष्मी संचालक आहेत. त्या तमिळनाडू भाजपाच्या उपाध्यक्ष आहेत. वरील सर्व नावे पाहता भाजपाच्या याच नेत्यांना स्वायत्त संचालकाची पदे देण्यात आली आहेत जे निवडणूकांमध्ये हरले आहेत तर कोणी कोणत्यातरी राजकीय नेत्याच्या जवळचे आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent directors of psus belong to the independent half while the bjp abn
First published on: 29-06-2021 at 11:12 IST