नवी दिल्ली : भारत व चीन यांच्या लष्करांदरम्यानच्या चर्चेची चौदावी फेरी निर्णायक ठरली नाही, मात्र उर्वरित मुद्दय़ांबाबत ‘परस्परमान्य तोडगा काढण्यासाठी’ लष्करी व राजनैतिक माध्यमातून संवाद सुरू ठेवण्याबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले.सीमाविषयक चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर व्हावी याबद्दल आपले मतैक्य झाले असल्याचे दोन्ही देशांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले.

पूर्व लडाखमधील पॅट्रोलिंग पॉइंट १५ (हॉट स्प्रिंग्ज) येथून सैन्य माघारी घेण्याशी संबंधित मुद्दय़ांचे चर्चेच्या १५व्या फेरीत निराकरण करण्याबाबत भारत आशावादी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी म्हटले होते.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवरावर पूल बांधल्याबद्दल भारताने चीनवर टीका केल्यानंतर चर्चेची ही ताजी फेरी पार पडली आहे. याच वेळी, हा भाग सुमारे ६० वर्षे चीनच्या अवैध कब्ज्यात असल्याचेही भारताने म्हटले होते.

भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरीय चर्चेची चौदावी फेरी बुधवारी पूर्व लडाखमधील चुशुल- मोल्दो सीमेवर प्रत्यक्ष ताबा रेषेच्या चीनकडील बाजूला पार पडली. दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार खात्यांचे प्रतिनधी या चर्चेदरम्यान उपस्थित होते, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. पश्चिम भागातील (लडाख सीमा) प्रत्यक्ष ताबा रेषेवरील संबंधित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी मतांचे ‘मनमोकळेपणाने व सखोल’ आदानप्रदान केले, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आपापल्या देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याचे, तसेच उर्वरित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी काम करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.