दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्राने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे आता सारखरेच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे.

निर्यातीमुळे अन्नधान्याचे भाव नियंत्रणाबाहेर

या वर्षी देशात साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. परिणामी सारखेच्या दरात वाढ झाली होती. वाढत्या साखरेच्या दर कमी करण्यासाठी केंद्रसरकारतर्फे ३१ ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे. निर्यातीमुळे भाव नियंत्रणाबाहेर जाऊ लागले आहेत.

साखर निर्यातीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर
साखर निर्यातीच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. संपूर्ण जगात फक्त ब्राझील असा देश आहे, जो भारतापेक्षा जास्त साखर निर्यात करतो. अशा परिस्थितीत मोदी सरकारने साखरेवर बंदी घातली तर अनेक देशांसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धानंतर जगभरात गव्हाची तीव्र टंचाई निर्माण झाली होती, कारण हे दोन्ही देश जवळपास २५ टक्के निर्यात व्यापतात. अशा परिस्थितीत भारतातून गव्हाची निर्यात वेगाने वाढू लागली. अधिक निर्यातीमुळे भारतातील गव्हाचे भावही वाढू लागले. अखेर गेल्या आठवड्यात सरकारने गव्हाच्या किमतीला लगाम घालण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली होती.