नवी दिल्ली : देशभरात २,५८,०८९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने सोमवारी दिली. त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी ७३ लाख ८० हजार २५३ झाली असून त्यापैकी ८,२०९ जण ओमायक्रॉनबाधित आहेत.

ओमायक्रॉनची लागण झालेल्या ८,२०९ रुग्णांपैकी ३,१०९ जण या आजारातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक १,७३८ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली, त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये १,६७२, राजस्थानात १,२७६, दिल्लीमध्ये ५४९, कर्नाटकात ५४८ आणि केरळमध्ये ५३६ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १६ लाख ५६,३४१ असून २३० दिवसांतील ती सर्वाधिक संख्या आहे. सोमवारी दिवसभरात ३८५ मृत्यूची नोंद झाली असून करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार लाख ८६,४५१ झाली आहे. एकूण करोनाबाधितांपेक्षा उपचाराधीन रुग्णांची संख्या ४.४३ टक्के असून बरे होण्याचा दर ९४.२७ टक्के आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.