scorecardresearch

देशात १२-१४ वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चपासून ? ; करोना गटाचे कार्याध्यक्ष डॉ. अरोरा यांचे संकेत

नवी दिल्ली : मार्च महिन्यापासून १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिले. सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून मार्चपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता अरोरा यांनी व्यक्त केली. देशात १५-१८ वयोगटातील मुलांची संख्या सात कोटी ४० लाख […]

नवी दिल्ली : मार्च महिन्यापासून १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिले. सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून मार्चपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता अरोरा यांनी व्यक्त केली.

देशात १५-१८ वयोगटातील मुलांची संख्या सात कोटी ४० लाख ५७ हजार असून त्यापैकी तीन कोटी ४५ लाख मुलांनी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतली आहे. जानेवारीच्या अखेपर्यंत बहुतेक मुलांची पहिली मात्रा पूर्ण होईल. २८ दिवसांनी दुसरी मात्रा देण्यात येणार असल्याने त्यांचे लसीकरण मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे अरोरा म्हणाले. १५-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार आहेत. हे लसीकरण मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असे अरोरा म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India may begin vaccination for 12 14 year age group from march zws

ताज्या बातम्या