भारतीय नौदलाच्या ‘इंडियन नेव्ही डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल’ला (DSRV) भारत-पाकिस्तान युद्धातील पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. पाकिस्तानची ही पाणबुडी ४ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बुडाली होती. या पाणबुडीचे अवशेष समुद्रकिनाऱ्यापासून साधारण २ ते २.५ किमी अंतरावर १०० मीटर खोल समुद्रात आढळले आहेत. दरम्यान, भारतीय नौदल पाणबुडीच्या या अवशेषांना बाहेर काढणार नाही.

पाणबुडी १९७१ साली पाकिस्तानच्या कराची येथून निघाली होती

१९७२ साली संपलेल्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानची पीएनएस गाझी ही पाणबुडी एकूण ९३ जणांना घेऊन विशाखापट्टनमकडे निघाली होती. मात्र विशाखापट्टनमच्या किनाऱ्यावरच ही पाणबुडी बुडाली होती. भारत-पाकिस्तान युद्धातील ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. या युद्धानंतर १९७२ साली स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली होती. अमेरिकेत निर्मिती करण्यात आलेल्या या पीएनएस गाझी पाणबुडीच्या मदतीने पाकिस्तान भारताच्या आयएनएस विक्रांत या जहाजावर हल्ला करणार होता. मात्र पाकिस्तानची ही योजना अयशस्वी झाली. आपली मोहीम फत्ते करण्यासाठी ही पाणबुडी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या कराची येथून निघाली होती. या पाणबुडीने ४८०० किमीचे अंतर यशस्वीपणे पार केले होते. या पाणबुडीला विझाग समुद्रकिनाऱ्याकडे जायचे होते.

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Indian Navy
भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांच्या तावडीतून २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका
Who are Majeed Brigade
माजीद ब्रिगेड कोण आहे? पाकिस्तानातल्या ग्वादर बंदरावर का केलं आक्रमण?
Why does Balochistan province want to secede from Pakistan Why did Balochistan attack Gwadar port
बलुचिस्तान प्रांताला पाकिस्तानपासून अलग का व्हायचे आहे? ग्वादार बंदरावर बलुचिस्तानींनी हल्ला का चढविला?

भारतीय नौदलाने हल्ला केल्यामुळे जलसमाधी

मात्र पाकिस्तानची ही योजना हाणून पाडण्यासाठी भारताने आपली आयएनएस राजपूत ही युद्धनौका पाठवली होती. या युद्धनौकेने पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचा शोध घेत तिच्यावर हल्ला केला. परिणामी त्या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. पाकिस्तानला मात्र हे मान्य नाही. पीएनएस गाझीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिला जलसमाधी मिळाली, असे पाकिस्तानचे मत आहे. बंगालच्या खाडीजवळ विझागजवळ फक्त पीएनएस गाझी ही एकच पाणबुडी नाही. याच भागात जपानच्या आरओ-११० नावाच्या पाणबुडीला जलसमाधी मिळालेली आहे. दुसऱ्या महायुद्धात १२ फेब्रुवारी १९४४ रोजी ही घटना घडली होती.

भारतीय नौदल पाणबुडीच्या अवशेषांना बाहेर काढणार नाही

पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष मिळाल्यानंतर भारतीय नौदल कर्मचाऱ्याने याबाबत अधिक माहिती दिली आहे. “विझाग समुद्रकिनारी या पाणबुडीचे अवशेष सापडले. भारतीय नौदल मात्र या अवशेषांना हात लावणार नाही. कारण जलसमाधी मिळालेल्या जहाजाला युद्धादरम्यान मृत्यू झालेल्या सैनिकांचे अंतिम विश्रांतीस्थान मानले जाते. त्यामुळे आम्ही त्या पाणबुडीच्या अवशेषांना हात लावणार नाही,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.