ओडिशाच्या चांदीपूरमध्ये इंटीग्रेटेड टेस्ट रेंज येथून मध्ये बॅलेस्टिक मिसाइल अग्नि-५ चं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या परीक्षणात सर्व संचालन आणि तंत्रज्ञानाच्या मानकांची नोंदणी झाली. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीत करण्यात आली. अग्नि -५ हे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणार एकमेव आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइल आहे. अग्नि -५ या मिसाइलची मारक क्षमता ५ हजार किमीपेक्षा अधिक आहे. मिसाइलमध्ये मल्टीपल इंडिपेंडेंटी टार्गेटेबल री-एंट्री वेईकल्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे. म्हणजे हे क्षेपणास्त्र एकदा लाँच केल्यानंतर अनेक टार्गेटवर हल्ला करु शकतं. अग्नि-५ मध्ये दीड टनांपर्यंत अणवस्त्रं वाहून नेण्याची क्षमताही आहे.
अग्नि ५ चा वेग मॅक २४ इतका आहे
अग्नि -५ चा वेग मॅक २४ आहे या क्षेपणास्त्राची लाँचिंग यंत्रणा कॅनिस्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे. या कारणामुळं याची वाहतूक करणं देखील सोपं आहे. सध्या भारताशिवाय केवळ आठ देशांकडे इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल आहे. रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्त्रायल, ब्रिटन आणि कोरियाचा समावेश आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी आज (२० ऑगस्ट २०२५) रोजी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड अंतर्गत करण्यात आली. या क्षेपणास्त्राने सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष पूर्ण केले आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते, ही चाचणी नियमित प्रक्रियेचा एक भाग आहे जेणेकरून सिस्टम तयार ठेवता येईल आणि गरज पडल्यास सिस्टम वेगात तैनात आणि सक्रिय करता येईल.