ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच ६) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने हे व्हेइकल विकसित केले आहे. सकाळी ११ वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला.

HSTDV चाचणी यशस्वी होण्याचा अर्थ हाच आहे की, DRDO पुढच्या पाचवर्षात स्क्रॅमजेट इंजिनसह हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करु शकते, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. HSTDV चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले.

HSTDV वेगळेपण काय?
अन्य क्षेपणास्त्रे बॅलेस्टिक ट्रॅजेक्टरी फॉलो करतात. म्हणजेच सहजतेने त्या क्षेपणास्त्रांच्या मार्गावर लक्ष ठेवता येते. अशा क्षेपणास्त्रांमुळे शत्रूला तयारी करण्याचा आणि प्रतिहल्ला करण्याची संधी मिळते. पण हायपरसॉनिक शस्त्राचा असा कुठला निश्चित मार्ग नसतो. त्यामुळे शत्रूला हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या मार्गाचा अंदाज लावता येत नाही. स्पीड इतका प्रचंड असतो की, शत्रूला कळण्याआधी लक्ष्यावर प्रहार झालेला असेल. म्हणजेच सोप्या शब्दात शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदता येते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India successfully tests hypersonic technology demonstrator with scramjet engine dmp
First published on: 07-09-2020 at 16:18 IST