पाकिस्तानी सेनेने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पूंछमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार केला. यामध्ये रवि रंजन कुमार सिंह हे शहीद झाले. तर अन्य चार जवानही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी पाकिस्तानकडून सीमा रेषेजवळ असलेल्या चौक्यांना लक्ष्य केले गेले. शिवाय सीमेलगतच्या गावांवर देखील उखळी तोफांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केले. या निर्णयाने पाकिस्तानला जोरदार झटका बसला असून, त्यानंतर मिळेल त्या मार्गाने रोष व्यक्त करणे पाकने सुरू केले आहे.

या अगोदर पाकिस्तानी सेनेकडून रविवारी पुंछ जिल्ह्यातील मेंढर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. एवढेच नाहीतर सीमेलगतच्या गावांवर उखळी तोफांचाही मार केला होता. ज्यामध्ये एक दहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली होती. तसेच स्वातंत्र्यदिनीही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता.