एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी झिम्बाब्वेमध्ये भारतीय क्रिकेटपटूला अटक करण्यात आल्याचे वृत्त भारताचे झिम्बाब्वेमधील राजदूतांनी स्पष्टपणे फेटाळले. बलात्कार प्रकरणात भारतीय क्रिकेटपटूला झिम्बाब्वेमध्ये अटक करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही हा आरोप निराधार असल्याचे सांगितले.
बलात्कार प्रकरणामध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचा सहभाग नाही. यासंबंधीचे वृत्त चुकीचे आहे. प्रायोजकांशी संबंधित एका भारतीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पण त्यानेही त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे, असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
झिम्बाब्वेमधील भारताचे राजदूत या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian arrested in zimbabwe for rape not a cricketer clarifies mea
First published on: 19-06-2016 at 16:51 IST