Binil T. B. death in Russia-Ukraine Conflict : रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिक व दोन्ही बाजूच्या हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान, या युद्धात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याचा एक नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाचं नाव बिनिल टी. बी. असं असून तो ३२ वर्षांचा होता. बिनिल हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी होता. तर जैन टी. के. (वय २७) हा तरुण जखमी झाला आहे. तो देखील वडक्कनचेरी भागातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी बिनिलच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली होती की एका ड्रोन हल्ल्यात केरळमधील दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर बिनिलच्या कुटुंबाने अधिक माहिती मिळवण्याचा व बिनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बिनिलची माहिती मिळाली नाही, तसेच त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.

बिनिल व जैन यांचे नातेवाईक सतीश यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की बिनिलची पत्नी जोसी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. तिला दूतावासाकून अधिकृतरित्या बिनिलच्या निधनाचं वृत्त मिळालं आहे. रशियन सैन्याच्या हवाल्याने तिला ही माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Japan Earthquake : जपानमध्ये ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

चार महिन्यांपासून मायदेशी परतण्याचे प्रयत्न अपयशी

बिनिल व जैन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घरी परतण्यासाठी प्रयत्न करत होते. गेल्या महिन्यात बिनिलने दी इंडियन एक्सप्रेसला काही व्हॉईस मेसेजेस पाठवले होते. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की तो गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून भारतात परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो सातत्याने मॉस्कोमधील दूतावासाशी संपर्क साधत होता. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

हे ही वाचा >> Crime News : “मृत्यूनंतर काय होतं?”, गुगलवर सर्च केलं आणि स्वत:वरच झाडली गोळी; ९वीत शिकणाऱ्या मुलाचे धक्कादायक कृत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिनिलने पाठवले होते व्हॉईस मेसेजेस

केरळमध्ये इलेक्ट्रिशियनचं काम करणाऱ्या बिनिलने सांगितलं होतं की “मानसिक व शारीरिकदृष्ट्या आम्ही खूप थकलेलो आहोत. आम्ही रशियाव्याप्त युक्रेनच्या भागात आहोत. आमचे कमांडर आम्हाला सांगत आहेत की तुमचा एक वर्षाचा करार होता. त्यामुळे तुम्हाला असं अर्ध्यातून परत जाता येणार नाही. आम्ही आमच्या सुटकेसाठी स्थानिक कमांडर्सकडे विनवण्या करत आहोत. मात्र ते आम्हाला इथून माघारी परतू देत नाहीत. त्यानंतर आता थेट बिनिलच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे.