ब्रिटनमधील डर्बी शहरामधील एका भारतीय आजोबांची आपल्या गार्डनमध्ये जगातील सर्वात लांब आकाराच्या काकडीचे उत्पन्न घेतले आहे. १९९१ साली भरतातून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या रघबीर सिंग संघेडा यांनी आपल्या ग्रीनहाऊसमध्ये १२९ सेंटीमीटर लांब (५१ इंच) काकडीचे उत्पन्न घेतले आहे. या आधीचा सर्वात लांब काकडी उगवण्याचा विक्रमही ब्रिटनमधील इयान नेल या व्यक्तीच्या नावावर होता. इयान नेल यांनी २०११ साली ४२.१३ इंच लांब काकडीचे उत्पन्न घेतले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतामध्ये असताना शेती हाच मुख्य व्यवसाय असणाऱ्या रघबीर सिंग यांनी या विक्रमसाठी आपल्या मेहनतीबरोबरच प्रार्थनाही उपयोगात असल्याचे सांगितले. मला जगातील सर्वात लांब काकडीचे उत्पन्न घेता यावे यासाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करायचो अशी माहिती रघबीर यांनी दिली. ते स्थानिक गुरुद्वारेत ग्रंथ वाचनाचे काम करतात तसेच त्यांनी आपली शेतीची आवड ब्रिटनमध्ये गेल्यानंतर ग्रीनहाऊसच्या माध्यमातून जपली आहे. या काकडीने विक्रम मोडला असला तरी या काकडीची लांबी अजूनही वाढत असल्याचे रघबीर यांनी सांगितले.

जगातील सर्वात लांब काकडीचे उत्पन्न घेण्याचा विक्रम नावावर झाल्यानंतर रघबीर यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना या काकडीच्या उत्पन्नाबद्दलची माहिती दिली. मी रोज ग्रीनहाऊसमध्ये जाऊन काकडीची लांबी किती वाढली हे पहायचो. मी देवाकडे अनेकदा प्रार्थना करायचो की या काकडीचा आकार दिवसोंदिवस वाढत रहावा. सध्या काकडीची लांबी वाढत असल्याने अद्याप मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे यासंदर्भात मी काहीही अर्ज केला नसल्याचे सांगतानाच काकडीचा आकार वाढण्याचे थांबले की मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे या काकडीची नोंद करेल अशी माहिती त्यांनी दिली. रघुबीर दिवसातून तीन वेळा काकडीच्या या वेलीला पाणी घालतात आणि थोडे खत टाकतात. मी रोज या काकडीच्या वेलाबरोबर तीन तास घालवत असल्याचेही रघुबीर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

रघबीर सिंग संघेडा

मागील वर्षी घेतले होते ३९ इंच लांब काकडीचे उत्पन्न

मागील वर्षी रघुबीर यांनी ३९ इंच लांब काकडीचे उत्पन्न घेतले होते. मी तरुण असल्यापासून शेती करतोय पण अशाप्रकारची भाजांची वाढ मी कधी पाहिली नाही असे प्रांजळपणे कबूल करतानाच ब्रिटनमधील उष्ण हवामानामुळे आपल्याला लांब आकाराच्या काकडीचे उत्पन्न घेण्यास मदत झाल्याचे रघुबीर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian sikh man in uk grows worlds longest cucumber
First published on: 06-08-2018 at 17:39 IST