पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेला संघर्ष टीपेला पोहचला आहे. हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेक विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. अशातच एक भारतीय केअर टेकर महिलाही जखमी झाली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला केला तेव्हा ती तिच्या पतीशी व्हिडीओ कॉलवर बोलत होती. शीजा आनंद मागच्या सात वर्षांपासून इस्रायलमध्ये वास्तव्य करते आहे. ती आता या हल्ल्यात जखमी झाली आहे.

नेमकी काय घडली घटना?

शनिवारी इस्रायलच्या दक्षिण भागात असलेल्या अश्कलोन या ठिकाणी हवाई हल्ले झाले. त्यावेळी भारतीय केअर टेकर असलेली शीजा आनंद ही महिला जखमी झाली आहे. ४१ वर्षीय शीजा आनंद मागच्या सात वर्षांपासून इस्रायलमध्ये वास्तव्य करते आहे. शनिवारी दुपारी जेव्हा हल्ला झाला तेव्हा ती तिच्या पतीशी व्हिडीओ कॉलवर बोलत होती. त्याचवेळी गोळीबार आणि हल्ला सुरु झाला आणि त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात मिया खलिफाची उडी, कायली जेनरवर खास शब्दांत ‘फायरींग’

शीजाच्या पतीने काय सांगितलं?

शीजा आनंदच्या पतीने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीत हे सांगितलं की शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान आम्ही व्हिडीओ कॉलवर बोलत होतो आणि त्याचवेळी हा हल्ला झाला. ती मला सांगत होती की सध्या रॉकेट हल्ले होत आहे. मी तिला सुरक्षित स्थळी जा असं सांगितलं होतं पण तितक्यात फोन कट झाला. त्यानंतर मला समजलं की शीजा जिथे होती तिथेच स्फोट झाला आहे. मी शीजाबाबत माहिती मिळवण्यासाठी तिच्या मित्रांना, मैत्रिणींना फोन केला. त्यानंतर मला शीजा जखमी झाल्याची माहिती मिळाली. तसंच तिला रुग्णालयात नेण्यात आल्याचंही मला तिच्या मित्र-मैत्रिणींकडून समजलं. शीजाच्या मणक्याला दुखापत झाली आहे. तसंच शीजाच्या पोटावर, छातीवर आणि पायांवरही जखमा झाल्या आहेत. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिच्या एका मित्राने व्हिडीओ कॉलवर आमचं बोलणं करुन दिलं. तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येणार आहे असंही समजल्याचं शीजा आनंदच्या पतीने सांगितलं.