नववर्षात देशात ‘लष्करे तैय्यबा’ या दहशतवादी संघटनेकडून हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद भवन आणि लष्कराचे मुख्यालय दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून, सीमेपलीकडून काही दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. याआधी सोमवारी केंद्र सरकारने नववर्षानिमित्त करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशनवेळी मुख्यत्वे पर्यटनस्थळांवर हल्ले होण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच राज्यांना सतर्कतेच्या सूचना देखील दिल्या आहेत. महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारांना दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2015 रोजी प्रकाशित
मोदी, संसद भवन आणि लष्कराचे मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
सीमेपलीकडून काही दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 30-12-2015 at 13:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intelligence alert regarding terror attacks by lashkar e taiba on pm modi and parliament