आयपीएल २०२१मध्ये आज (२ मार्च) दोन सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघाचा हा सातवा सामना असून या सामन्यात विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
#SRH have won the toss and they will bowl first against #RR
Follow the game here –https://t.co/oGFXokMmUq #RRvSRH #VIVOIPL pic.twitter.com/1AIp5snfkC
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
कोण आत कोण बाहेर?
राजस्थान संघातून अनुज रावत पदार्पणाचा सामना खेळत आहे. तर जयदेव उनाडकटला बसवून कार्तिक त्यागीला संघात स्थान देण्यात आले आहे. हैदराबादनेही संघात मोठे बदल केले आहेत. डेव्हिड वॉर्नर, जगदीश सुचीत आणि सिद्धार्थ कौल यांच्या जागी भुवनेश्वर कुमार, अब्दुल समद आणि मोहम्मद नबी यांनी संघात जागा मिळवली आहे.
सनरायझर्स हैदराबादची कामगिरी आतापर्यंत अत्यंत खराब राहिली असून त्यांनी ६ पैकी केवळ १ सामना जिंकला आहे. या कामगिरीनंतर डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून केन विल्यमसनला कर्णधारपदी नियुक्त केले गेले आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सची कामगिरीही अत्यंत खराब झाली आहे. त्यांनी ६ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघाना विजयी पथावर परतण्याची इच्छा आहे.
हेड-टू-हेड आकडेवारी
आयपीएलच्या हेड-टू-हेड आकडेवारीवरून दोन्ही संघामध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. या शर्यतीत हैदराबाद राजस्थानपेक्षा ७-६ अशा आघाडीवर आहे. मागील हंगामात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने हैदराबादविरुद्ध सर्वाधित धावा (३८२) केल्या आहेत. तर राजस्थानविरुद्ध मनीष पांडेने २१५ धावा केल्या आहेत. हैदराबागच्या भुवनेश्वर कुमारने राजस्थानविरुद्ध सर्वाधिक ९ बळी घेतले आहेत. जयदेव उनादकटने राजस्थान रॉयल्ससाठी सनरायझर्स हैदराबादच्या ६ फलंदाजांना बाद केले आहे.
प्लेईंग XI
राजस्थान – संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया.
हैदराबाद – केन विल्यमसन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, विजय शंकर, केदार जाधव, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, अब्दुल समद, मोहम्मद नबी.
सामन्याचे ठिकाण – अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली