स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी एस. श्रीशांतला अटक केल्यानंतर त्याचे पैसे आणि पुरावे म्हणून उपयोगी पडतील असे साहित्य लपविणारा त्याचा मित्र अभिषेक शुक्ला याला गुरुवारी दिल्लीतील मुख्य महानगरदंडाधिकाऱयांनी जामीन मंजूर केला. शुक्लाला न्यायालयीन कोठडीत ठेवावे, ही सरकारी वकिलांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली.
शुक्ला याला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्याला आपला पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून, मुंबईसोडून अन्य कुठेही जाऊ नये, असेही बजावण्यात आले आहे. शुक्ला हा मुंबईतील खासगी कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर काम करतो. दिल्लीचे मुख्य महानगरदंडाधिकारी लोकेशकुमार शर्मा यांनी त्याला जामीन मंजूर केला.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2013 रोजी प्रकाशित
श्रीशांतचा मित्र अभिषेक शुक्लाला जामीन
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी एस. श्रीशांतला अटक केल्यानंतर त्याचे पैसे आणि पुरावे म्हणून उपयोगी पडतील असे साहित्य लपविणारा त्याचा मित्र अभिषेक शुक्ला याला गुरुवारी दिल्लीतील मुख्य महानगरदंडाधिकाऱयांनी जामीन मंजूर केला.
First published on: 30-05-2013 at 03:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl spot fixing sreesanths friend abhishek shukla gets bail