समलिंगी संबंधांतून होणाऱ्या विवाहांना जनमताच्या माध्यमातून मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. तब्बल साडेतीन लाख नागरिकांनी यासाठी केलेल्या मतदानात तब्बल ६२ टक्के नागरिकांनी समलैंगिक विवाहाच्या बाजूने मत नोंदविले. त्यामुळे आयरिश सरकारला समलैंगिक विवाहाला परवानगी द्यावी लागली. आयर्लंडच्या जनतेचा हा निर्णय कट्टर विचारसरणीच्या कॅथॉलिक चर्चला धक्का मानला जात आहे.
समलिंगी जोडप्यांना विवाहास मान्यता देणारी घटनादुरुस्ती आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये करावी का? या मुद्द्यावर ४३ पैकी ४० क्षेत्रांतून लोकांनी मते मांडली. डबलिन कॅस्टल मैदानात हजारो समलैंगिक विवाह समर्थक एकत्र आले होते आणि निकालानंतर आपला आनंद व्यक्त करत त्यांनी सप्तरंगी झेंडे फडकावले.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2015 रोजी प्रकाशित
आयर्लंडमध्ये समलैंगिक विवाहाला मंजुरी
समलिंगी संबंधांतून होणाऱ्या विवाहांना जनमताच्या माध्यमातून मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे

First published on: 24-05-2015 at 12:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ireland votes to approve gay marriage putting country in vanguard