इसिसच्या अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेला जॉर्डनचा वैमानिक मुताह अल कसाबेह याची जाळून हत्या केली व आता जॉर्डनने त्या घटनेचा सूड उगवण्याचा इशारा दिला असून, इसिसला भूमी हादरवून टाकणारा प्रतिसाद यामुळे दिला जाईल असे म्हटले आहे.जॉर्डनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की आता जॉर्डनमधील तुरुंगात असलेली इराकी महिला व इतर सगळय़ा कैद्यांना फाशी देऊ. जॉर्डनच्या वैमानिकाचे विमान गेल्या डिसेंबरमध्ये सीरियात कोसळले होते व त्यानंतर इसिसच्या अतिरेक्यांनी त्याला ओलिस ठेवले होते त्याच्या मृत्यूची व्हिडिओ जारी करण्यात आली असून, जाळून टाकण्यापूर्वी त्याला एका काळय़ा िपजऱ्यात डांबले होते. जॉर्डनच्या अधिकाऱ्यांनी ती दृश्यफीत खरी असल्याचे सांगितले आहे.अमेरिकी आघाडीच्या वतीने लढताना जॉर्डनने सीरियावर हवाई हल्ले केले असून, आता तर इसिसला निर्णायक व हादरवून टाकणारा प्रतिसाद मिळेल असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2015 रोजी प्रकाशित
जॉर्डनच्या ओलिस वैमानिकाची हत्या
इसिसच्या अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेला जॉर्डनचा वैमानिक मुताह अल कसाबेह याची जाळून हत्या केली व आता जॉर्डनने त्या घटनेचा सूड उगवण्याचा इशारा दिला असून, इसिसला भूमी हादरवून टाकणारा प्रतिसाद यामुळे दिला जाईल असे म्हटले आहे.
First published on: 05-02-2015 at 03:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis burnt jordan pilot alive