जीएसएलव्ही मार्क- ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आणखी एका मोहीमेसाठी सज्ज झाले आहे. इस्रोचे पीएसएलव्ही प्रक्षेपक शुक्रवारी ३१ नॅनो उपग्रह घेऊन अवकाशात झेपावणार आहे. ३१ पैकी २९ उपग्रह हे ऑस्ट्रीया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, फ्रान्स, फिनलँड अशा १४ देशांचे आहेत. याशिवाय तामिळनाडूतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले एक नॅनो उपग्रहदेखील अवकाशात झेपावणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जून महिन्याच्या सुरुवातीलाच इस्रोने जीएसएलव्ही-मार्क ३ च्या साह्याने जीसॅट-१९ हे उपग्रह अंतराळात पाठवले होते. या यशस्वी प्रक्षेपणानंतर शुक्रवारी इस्रो आणखी एका मोहीमेसाठी सज्ज झाले आहे. इस्रोचे पीएसएलव्ही हे प्रक्षेपक १४ देशांचे २९ नॅनो उपग्रह, भारताचे कार्टोसॅट-२ई आणि तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह घेऊन अंतराळात झेपावणार आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजून २९ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील लाँचपॅडवरुन हे प्रक्षेपण होणार आहे.

ऑस्ट्रीया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूरोप आणि अमेरिका अशा १४ देशांच्या २९ उपग्रहांचा यामोहीमेत समावेश आहे. कार्टोसॅट-२ई या भारतीय उपग्रहाचे वजन ७१२ किलो असून कार्टोसॅट- २ या मालिकेतील हे सहावे उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून आलेल्या छायाचित्रांचा वापर नकाशा तयार करण्याच्या कामासाठी केला जाईल. शहरी व ग्रामीण अॅप्लिकेशन्स तसेच किनारपट्टीवरील जमिनीचे नियमन आणि देखरेख आदी कामांसाठीही या उपग्रहाचा वापर होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro will launch 31 satellites including nano satellites from us france 14 countries friday
First published on: 20-06-2017 at 21:34 IST