पीटीआय, उत्तरकाशी

खोदकाम करणारे ऑगर यंत्र ढिगाऱ्यात निकामी झाल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला शनिवारी अन्य पर्यायांचा शोध घेणे भाग पडले. कोसळलेल्या बोगद्यातील ढिगारा कामगारांमार्फत उपसणे किंवा बोगद्याच्या टेकडीवरून ८६ मीटरचा उभा मार्ग तयार करणे या दोन पर्यायांवर विचार सुरू आहे. त्यामुळे कामगारांच्या सुटकेला अनेक आठवडे लागण्याची शक्यता आहे.

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

कामगारांच्या सुटका मोहिमेबद्दलची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सईद अता हसनैन यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले,‘‘अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. आता बोगद्याच्या वरच्या बाजूने टेकडीवरखोदकाम करून पर्यायी उभा बचाव मार्ग तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले असून येत्या २४ ते ३६ तासांत थांबलेली मोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल.’’ कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्याच्या वरच्या बाजूने सुमारे ८६ मीटर खोदकाम करण्याची गरज आहे, असेही हसनैन यांनी सांगितले.कामगारांना वाचवण्यासाठी शुक्रवारी रात्री बोगद्याच्या कोसळलेल्या भागातील खोदकाम पुन्हा थांबवावे लागले. खोदकाम पुन्हा सुरू झाल्यानंतर थोडय़ाच वेळात, ऑगर यंत्र बोगद्याच्या छतासाठी उभ्या केलेल्या धातूच्या खांबांना धडकल्याने त्यात बिघाड निर्माण झाला. त्यामुळे सिल्क्यारा बोगद्यात १३ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका करण्यासाठी ‘ऑगर’ यंत्राने खोदकाम करण्याचे प्रयत्न जवळजवळ थांबले आहेत.

सिल्क्यारा बोगद्यात १३ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी खोदकामात वापरण्यात येणाऱ्या ऑगर यंत्राची पाती ढिगाऱ्यात अडकली आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी ही माहिती दिली. या पात्यांचा एक भाग कापण्यात आला आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ‘प्लाझ्मा कटर’ हैदराबादहून हवाई मार्गाने आणले जात आहे, असेही धामी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन हल्ला; राजधानी कीव्ह लक्ष्य

नातलग अस्वस्थ

सुटका मोहिमेत वारंवार अडथळे येत असल्याने दुर्घटनास्थळी जमलेले कामगारांचे नातलग अस्वस्थ आहेत. अडकून पडलेल्या वीरेंद्र या कामगाराशी त्याची भावजयी सुनीता यांनी शनिवारी सकाळी संवाद साधला. वीरेंद्रशी सुमारे दहा मिनिटे बोलणे झाले. आपण सकाळी काहीही खाल्लेले नाही आणि यापुढेही जेवण करणार नाही, आम्हाला बाहेर केव्हा काढणार, असे तो विचारत होता, असे सुनिता यांनी सांगितले.

ऑगर यंत्र निकामी

बोगद्यातील ढिगाऱ्यात खोदकाम करणारे ऑगर मशीन निकामी झाले आहे. त्यामुळे आता बोगद्यावरील टेकडीवर उभे खोदकाम करून किंवा यंत्राची मदत न घेता कामगारांमार्फत खोदकाम करण्याबरोबरच अन्य पर्यायांचा विचार सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी शनिवारी सांगितले.

दूरध्वनी संचाची सोय

सिल्क्यारा बोगद्याजवळ बीएसएनएलने दूरध्वनी संच बसवला असून अडकलेल्या कामगारांच्या नातलगांना त्यांच्या सतत संपर्कात राहाता येईल. अडकलेल्या कामगारांपर्यंतही दूरध्वनीसंच पोहोचवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी एक मोठे यंत्र बोगद्याच्या वरच्या टेकडीवर हलविण्यात आले. ही सुटका मोहीम अत्यंत कठीण असून सध्या दोन पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे.- सईद अता हसनैन, एनडीएमए सदस्य

कामगारांच्या सुटकेसाठी आम्ही पर्वताशी सामना करीत आहोत. तो आमच्या मार्गात अडथळे आणत आहे. तो आम्हाला कोणता मार्ग तयार करू देईल, हे माहीत नाही. आम्ही फक्त प्रयत्न करीत आहोत. – अरनॉल्ड डिक्स, आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ